🕒 1 min read
औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील कार्यालय प्रमुख यांची तहसील कार्यालय कन्नड येथे उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वारकड यांच्या उपस्थित बुधवार (ता.१९ ) रोजी मान्सून पूर्व नियोजन, जागतिक पर्यावरण दिनी वृक्ष लागवड, व लसीकरणाबाबत तालुकास्तरीय बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
यावेळी तालुक्यातील नदी काठी असलेल्या ४८ पूरसदृश्य गावांमध्ये प्राधान्याने उपायोजना व मान्सून पूर्व नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तालुक्यातील विविध रस्त्यांवरील पुलांची दुरुस्ती, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प,साठवण तलाव,गाव तलाव यांची संबंधित विभागाने तात्काळ पहाणी करावे. गावागावांमधील पोहणाऱ्या व्यक्तींच्या याद्या तयार करण्यात याव्यात. मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करावी धोकादायक वा जीर्ण झालेल्या इमारतीमुळे आर्थिक व जीवित हानी होणार नाही यादृष्टीने नगर परिषद व ग्रामपंचयतीने कार्यवाही करावी.
ग्रामपंचायत व नगर परिषदेने पावसाचे पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यासाठी गावातील नाल्या यांची साफसफाई करावी. विविध धरणांचा पाझर तलावांचा संरक्षण आराखडा तयार करावा. वीज वितरण कंपनीने वीज वाहक तारांजवळील वृक्षांची छाटणी करावी तसेच इतर आवश्यक उपाययोजना करावी. शिक्षण विभागाने शाळेच्या इमारतीत सुस्थितीत आहे याबाबत पाहणी करावी आशा सूचना देण्यात आलेले आहेत.
विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून दि. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन प्रतिव्यक्ती तीन झाडे याप्रमाणे वृक्षलागवड करण्यासाठी वृक्ष लागवड आराखडा तयार करून तालुक्यामध्ये सर्व ग्रामपंचायत व नगरपालिकेतील सर्व प्रभागांमध्ये घन वृक्ष लागवड, गाव तेथे देवराई, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, सार्वजनिक विहिरीच्या शेजारी वृक्ष लागवड, स्मृतीवन, नदी व नाल्यांच्या काठावर बांबू लागवड अशा प्रकारचे कार्यक्रम हाती घेऊन लोकसहभागातून प्रतिव्यक्ती किमान तीन झाडांची लागवड होऊन जोपासल्या जाईल अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
तालुक्यात प्राप्त होणाऱ्या लसीचे योग्य नियोजन करून कमीत कमी वेलामध्ये जास्तीत जास्त लसीकरण होईल यासाठी प्रयत्न करावे. गावागावांमध्ये तपासण्या करून कोरोणा कोविड चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले.
या बैठकीस पोलीस निरीक्षक रेंगे, सुनील नेवसे, तालुका कृषी अधिकारी मुळीक, प्र मुख्याधिकारी शेख हारून, उपविभागीय अभियंता सोनकांबळे, भावठानकर, डाफने, वन परिक्षेत्र अधिकारी गायके, पाहरकर , लागवड अधिकारी बाणखेले, सहाय्यक निबंधक अर्चना वाडेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ गावंडे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट मात्र मृत्युदर कायम
- अखेर ‘त्या’ वादावर पडदा ; जयंत पाटलांच्या प्रकल्पांना मंजूरी
- पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांतील कोरोनाचा आढावा घेणार
- पुलाखाली आढळला युवकाचा मृतदेह; बोरगावात एकच खळबळ
- बीसीसीआयच्या महिला आणि पुरुष संघातील भेदभावावर हरमनप्रितने टाकला पडदा, दिले ‘हे’ उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
