नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची तारीख जाहीर केली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव (शालेय शिक्षण) अनिल स्वरूप यांनी अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा एकदा २५ एप्रिलला होणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, दहावीच्या गणित विषयाबाबत केलेल्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी तपास सुरू असून १५ दिवसांत फेरपरीक्षा घ्यायची अथवा नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगत फेरपरीक्षा झाल्यास ती फक्त दिल्ली आणि हरयाणामध्येच होईल आणि ती जुलैमध्ये घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पेपरफुटीमुळे दहावी, बारावीची परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने( सीबीएसई) घेतला होता. यावर्षी दहावी, बारावीची परीक्षा सुरु असतांना पेपरफुटीचे अनेक प्रकाराने समोर आले होते. अनेक प्रकरणामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा हात असल्याचे समोर आले होते. सीबीएसईने पेपरफुटीमुळे मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान, सीबीएसई परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच फुटल्या. हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा, पण स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहात? सरकारला जर प्रश्नपत्रिकांची गोपनीयता नीट राखता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष, त्यांनी का पुन्हा त्या विषयांच्या परीक्षेला बसायचं? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. तसेच त्यांनी पालकांना मुलांना फेरपरीक्षेला बसवू नका, असे आवाहन केले होते.
Regarding Class 10th re examination, as leak was restricted to Delhi and Haryana, if it at all a re-exam will happen, it will happen only in Delhi & Haryana and a decision will be taken on this in next 15 days. If at all a re-exam is done, it will be in July: Secretary Education
— ANI (@ANI) March 30, 2018
Re-examination of Class 12th exam will be on 25th April: Secretary Education #CBSEPaperLeak pic.twitter.com/V4P5IXKjpJ
— ANI (@ANI) March 30, 2018
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

