नवी दिल्ली- देशातील एकूण लसीकरण मोहिमेअंतर्गत 36.48 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडण्यात आला असल्याचे आज सकाळी सात वाजताच्या प्राथमिक आकडेवारीत निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत 47,40,833 सत्रांतून 36,48,47,549 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.गेल्या 24 तासांत 33,81,671 लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
कोविड-19 लसी सार्वत्रिक मोफत उपलब्ध करून देण्याची मोहिम देशभर 21 जूनपासून सुरु झाली आहे. लसीकरणाची व्याप्ती आणि वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोविडचे 45,892 नवे रुग्ण आढळले. गेल्या 11 दिवसांपासून सातत्याने दैनंदिन रुग्णांची संख्या 50,000 पेक्षा कमी नोंदली गेली आहे.
केंद्र सरकार आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी समन्वय राखून सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे. भारतातील उप्चाराधीन रूग्णांची संख्या आज 4,60,704 वर पोहोचली असून, देशातील एकूण कोविड रुग्णांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1.50% इतके आहे. ही महामारी सुरु झाल्यापासून कोविड चा संसर्ग झालेल्या एकूण रूग्णांपैकी 2,98,43,825 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात, 44,291 रुग्ण बरे झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर 97.18% पर्यंत पोहोचला असून हा दर सातत्याने वाढतो आहे.
देशात चाचण्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढवण्यात आली असून, गेल्या 24 तासांत 18,93,800 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 42.52 कोटींपेक्षा अधिक (42,52,25,897) चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकीकडे चाचण्यांची संख्या वाढत असतांनाच साप्ताहिक रुग्ण पॉझिटिव्हीटी दर कमी होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. सध्या साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर, 2.37% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.42% इतका आहे. गेल्या 17 दिवसांपासून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सातत्याने 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे तर महिन्याभरापासून तो 5% पेक्षा कमी आहे.
महत्वाच्या बातम्या
- ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू आहे – नवाब मलिक
- ‘राज्यात मंजूर पोलिस ठाणी व कर्मचारी वसाहतींचे बांधकाम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा’
- लातूरमध्ये राष्ट्रवादीचा धमाका; भाजप आणि कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारी लावले गळाला
- नाथा भाऊंच्या पाठोपाठ मंदाकिनी खडसे यांनाही EDचं समन्स, खडसे कुटुंबाचा पाय आणखी खोलात
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो


