🕒 1 min read
मुंबई – पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर ईडीने खडसेंना समन्स बजावत काल चौकशीसाठी बोलावलं. यानंतर ते ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते. यावेळी एकनाथ खडसे यांची ईडीने तब्बल ९ तास कसून चौकशी केली आहे.
दरम्यान,काल झालेल्या चौकशी नंतर आता खडसे कुटुंबाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं त्यापाठोपाठ आता एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे.
2016 मध्ये एकनाथ खडसे हे राज्याचे महसूल मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला गेला. एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्व्हे क्रमांक 52/2 अ/ 2 मधील तीन एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे हा खरेदी केला.
या भूखंडाचा व्यवहार 3 कोटी 75 लाख रूपयांना अकानी नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केला. पण या भूखंडाचा सातबारा MIDC च्या नावावर होता. त्यामुळे खडसे यांनी पदाचा गैरवापर करून भूखंड खरेदी केल्याचा आरोप झाला. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावडे यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. एप्रिल 2017 मध्ये ACB ने म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी आणि अकानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. चौकशीही सुरू केली. मात्र 2018 मध्ये त्यांना क्लिन चिट देण्यात आली.
दरम्यान निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यासाठी झोटिंग समितीही नेमण्यात आली. या समितीमार्फत प्रकरणाची चौकशी झाली. त्यानंतर आता ईडीकडून चौकशी सुरू आहे. याआधीही एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची टीका राष्ट्रवादीकडून केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू आहे – नवाब मलिक
- ‘राज्यात मंजूर पोलिस ठाणी व कर्मचारी वसाहतींचे बांधकाम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा’
- लातूरमध्ये राष्ट्रवादीचा धमाका; भाजप आणि कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारी लावले गळाला
- वंचित बहुजन आघाडीपासून प्रकाश आंबेडकर काही काळ दूर; तर प्रभारी अध्यक्ष…
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
