🕒 1 min read
मुंबई – पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर ईडीने खडसेंना समन्स बजावत काल चौकशीसाठी बोलावलं. यानंतर ते ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते. यावेळी एकनाथ खडसे यांची ईडीने तब्बल ९ तास कसून चौकशी केली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने भाजपवर टीका केली आहे. ज्या प्रकरणात ईडी एकनाथ खडसे यांची चौकशी करत आहे त्याचाच आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचं खच्चीकरण केले होते. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही झाली. आता ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने चौकशी सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
दरम्यान भाजपला वाटत असेल की, या यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील तर तो भाजपचा गैरसमज आहे कुणीही या यंत्रणेला घाबरत नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.
ईडी किंवा इतर यंत्रणेमार्फत कितीही चौकशा लावल्या तरी सत्य आज ना उद्या समोर येणार आहेच. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केलं नाही त्यामुळे ते घाबरत नाहीत. यंत्रणांचा दुरुपयोग करणं हे भाजपचं काम आहे. निव्वळ महाराष्ट्रच नव्हे तर पश्चिम बंगाल, युपी असतील तिथे विरोधकांना त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम या यंत्रणांच्या माध्यमातून होत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मंत्री मंडळाच्या विस्तारानंतरही NDA मधील शीतयुद्ध थांबेना
- पैठण गेट येथे पाच मजली पार्किंगची भव्यदिव्य इमारत उभारणार
- महाराष्ट्रातील दोन दिग्गज मंत्र्यांना का द्यावा लागला राजीनामा ?
- वंचित बहुजन आघाडीपासून प्रकाश आंबेडकर काही काळ दूर; तर प्रभारी अध्यक्ष…
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
