पुणे : शहरामध्ये 25 सप्टेबर रोजी आलेल्या पुरामुळे पाणी व मलवाहिन्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. मलवाहिन्यांची वहन क्षमता कमी झालेली आहे. यामुळे सहा किलोमिटरच्या मलवाहिन्याची दुरुस्ती करावी लागणार आहे.
शहरामध्ये 25 सप्टेबर रोजी आलेल्या पुरामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे नाल्याला पुर आला. यामध्ये प्रामुख्याने अंबिलओढ्यचा समावेश होता. यामुळे महापालिका प्रशासनाने पुराची कारणे शोधण्यासाठी प्रायमुव्ह या संस्थेकडून ड्रोन सर्व्हेक्षण तसेच सद्य स्थितीची पाहणी करुन अहवाल तयार केला आहे. यामध्ये अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत.
पुरामुळे 29 हजार669 मिटरच्या पावसाळी वाहिन्यांना फटका बसला असल्यामुळे या बदलाव्या लागणार असून यासाठी 248 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. असे एका संस्थेेने केलेल्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.
प्रायमुव्ह संस्थेने अंबिलओढ्याचे सर्व्हेक्षण करुन अहवाल तयार केला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी नाल्याची रुंदी कमी झाल्याचे दिसून येत आहे. नाल्याची रुंदी वास्तविक 18 ते 22 मिटरपर्यंत असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पुलाचे पाणी गेले त्याठिकाणी नाल्याची रुंदी कमी असल्याचे दिसून येत आहेत.नाल्यावर बांधण्यात आलेली उद्याने सुध्दा नाल्याला अडथळा ठरत असून भविष्यात ही उद्याने काढावी लागणार असल्याचे प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1193438079840739328?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1193437792820322304?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

