पुणे : विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रमस्थळी फडणवीस-राऊत यांची गळाभेटही झाली होती. त्यानंतर आणखी एक राजकीय वर्तुळात भुवया उंचावणारी घटना घडली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर हे दोन्ही नेते भेटले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराचकाळ चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
‘भेटीत माझ्या मतदारसंघातील विकास कामांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. तसेच चंद्रपूर विमानतळाबाबतही आमच्यात बोलणी झाली, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. ‘भेटीमुळे ज्यांना राजकीय चर्चा करायची आहे, त्यांनी ती करू द्या. शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू असणार नाही, असे मुनगंटीवार यांनी भेटीबाबत वक्तव्य केले असल्याने भेटीबाबत संभ्रम वाढला होता.
या भेटीबाबत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळही यांनी भाष्य केले आहे. ‘मुख्यमंत्री राज्याचे आहेत. त्यांना कोणीही भेटू शकतात. मुनगंटीवार भेटू शकतात. फडणवीस भेटू शकतात. चंद्रकांतदादाही भेटू शकतात, असं सांगत पक्षात येणार का म्हणून मुनगंटीवारांना विचारा, असे देखील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलन : कलाकार, क्रिकेटर यांच्या ट्विटच्या मागे भाजपचा हात ?
- काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार ? अजित पवारांनी चर्चा धुडकावल्या !
- पक्षांतराचा इतिहास असलेल्या नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष करण्याचे धाडस पक्ष श्रेष्ठी करणार का ?
- पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक हवंच : छगन भुजबळ
- आरबीआयची आणखी एक कारवाई ! ‘या’ सहकारी संस्थेला ठोठावला ५५ लाखांचा दंड !

