नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा राज्यसभेला संबोधित केले. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार राज्यसभेच्या खासदारांना निरोप देण्यात आला. हे चारही सदस्य जम्मू काश्मिरचं प्रतिनिधित्व करत आहेत.
यावेळी मोदींनी गुलाम नबी आझाद यांच्या आठवणींना उजाळा दिला. एका दहशतवादी घटनेचा संदर्भ देताना मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ‘मला चिंता आहे की गुलाम नबीजीनंतर जो कोणी हा पदभार स्वीकारेल त्याला गुलाम नबीजी यांच्यासारखं बनता येईल का? गुलाम नबी आझाद यांच्यानंतर त्यांच्या पदावर येणाऱ्या नेत्याला त्यांची उणीव भरून काढणे थोडे कठीण जाईल. कारण गुलाम नबी हे पक्षासोबतच देशहिताकडेही लक्ष द्यायचे’, असे म्हणत मोदींनी अजादांचे तोंडभरून कौतुक केले आहे. ‘पद, सत्ता जीवनात येत जात राहते. मात्र, ती कशी पचवावी हे आझाद यांच्याकडून शिकावे’, असे म्हणत मोदींनी सदनात त्यांना सलाम केला.
राज्यसभेच्या सदनातील वातावरण काहीसं भावूक झालेलं असतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र, सारे चित्र बदलून टाकले. आठवले यांनी आझाद यांच्यावर लिहिलेली एक कविता सदनात वाचून दाखवली. आठवलेंनी त्यांच्या खास शैलीत कविता सादर करण्यात सुरुवात केल्याने, राज्यसभेतील सर्वच सदस्यांसह खुद्द गुलाम नबी आझादही हसू आवरू शकले नाहीत.
आठवलेंनी लिहिलेल्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी पुन्हापुन्हा या सदनात यावं अशी इच्छा आठवलेंनी व्यक्त केलीय. जर काँग्रेस तुम्हाला राज्यसभेत घेऊ इच्छित नाही, तर आम्ही तयार आहोत, असं म्हणत एक रंजक प्रस्ताव त्यांनी गुलाम नबी आझादां पुढं ठेवला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्रातील भाजपचे नेते उठसुठ आंदोलन करत होते, त्यांना काय म्हणायचं ते आम्हाला आता कळलं’
- …म्हणूनच आम्ही ठाकरे सरकारला स्थगिती सरकार म्हणतो; नवनीत राणा बरसल्या
- ‘खरे मोदी कोण? हा प्रश्न पंतप्रधानांनाच विचारायला हवा’
- कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण
- उद्धवा, अजब तुझे सरकार…देतो म्हणालात दहा हजार, हातावर ठेवले दोन हजार…अजब तुझे सरकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
