Share

आघाडीसाठी कॉंग्रेसने विलंब लावू नये – राष्ट्रवादी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्यामुळे महाराष्ट्रात आघाडी करण्याबाबतचा निर्णय करण्यास विलंब लावू नये असा सल्ला वजा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते डी.पी.त्रिपाठी यांनी काँग्रेसला दिला आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्रिपाठी

केंद्रातील सत्तेविरोधात सामान्य जनतेमध्ये संताप आहे. सत्ताधारी लोकशाही परंपरेनुसार कारभार करत नाहीत. राष्ट्रीय शांतता व सलोखा संकटात असल्यामुळे मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहीजे, असे सर्वच पक्षांचे मत आहे.

तर आघाडी करण्यास राष्ट्रवादी अनुकूल असून त्याचाच एक भाग म्हणून कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आम्ही उमेदवार उभे करणार नाही, असे सांगत त्रिपाठी यांनी काँग्रेस उमेदवारांसाठी राष्ट्रवादी प्रचारात उतरेल, असेही स्पष्ट केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!