Share

विधानसभा अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार ?

Published On: 

मुंबई – 5 जुलै आणि 6 जुलै या दोन दिवशी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पाडणार आहे. पण त्याआधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एक आठवण करून दिली आहे. येत्या 5 दिवसात पावसाळी अधिवेशन येऊ घातलं असताना अद्याप विधानसभा अध्यक्षपदाबाबत कोणताही निर्णय ठाकरे सरकारने घेतला नाही याची आठवण भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून करून दिली आहे.

दरम्यान, यानिमित्ताने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेत आला आहे. खरतर मागील अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा निकालात काढता आला असता मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना या निवडणुकीसाठी फारसे उत्साही असल्याचे दिसून आले नाही. सोबतच कोरोनाच्या स्थितीमुळे बरेच आमदार गैरहजर होते आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक घेतली तर काही दगाफटका होऊ शकतो अशी शंका आल्यानेच ती निवणूक टळली.

अध्यक्ष निवडीची प्रक्रियेसाठी किमान तीन दिवस लागतात. ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरायचा असतो त्याच्या आदल्या दिवशी तशी घोषणा करावी लागते. दुसऱ्या दिवशी अर्ज भरला जातो आणि तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष निवडणूक होत असते त्यामुळे या दोन दिवसांच्या अधिवेशनात आता हे दिव्य ठाकरे सरकार कसे पार पाडणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होणार, यावरून राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता आहे.  या अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मराठवाड्यातील काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर, मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा आहे. यातही संग्राम थोपटे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची जास्त चर्चा आहे.

दरम्यान, चव्हाण हे या अध्यक्षपदासाठी तयार होणार का याबाबत देखील उलटसुलट चर्चा असून चव्हाण यांना स्व. राजीव सातव यांच्या जागी खासदारकीची संधी दिली जाऊ शकते अशी देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जर असेच घडले तर मग उरलेल्या या नेत्यांपैकी एकाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

उरलेल्या नावांमध्ये संग्राम थोपटे हे देखील या पदासाठी सर्वाधिक चर्चा होत असलेले नाव आहे. संग्राम थोपटे हे पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. २००९ पासून सातत्याने ते या मतदारसंघातून निवडूण येत आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे ते चिरंजीव आहेत. संग्राम थोपटे यांची पवार घरण्याचे पारंपरिक विरोधक म्हणूनही ओळख आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!