Share

मला आपलेपण राष्ट्रवादीत मिळालं आहे त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश करतोय : राजीव आवळे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग पहातायला मिळत आहे. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीची वाट धरल्यानंतर आता जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पार पडला. माजी आमदार राजीव आवळे यांच्यासोबत इचलकरंजी नगरपरिषदेचे सदस्य अब्राहम आवळे, वडगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि कॉंग्रेसचे नेते रामभाऊ सुर्यवंशी, कबनूरचे भाजपाचे शहराध्यक्ष सुधाकर कुलकर्णी, भाजपाचे नितिन कामत, बाबू पतोरी, दिनेश डायमा, पिंपरी-चिंचवड येथील लहुजी सेनेचे युवराज दाखले, वडगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा लता सूर्यवंशी यांनी प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते महेश तपासे, कोल्हापूरचे जिल्हाअध्यक्ष ए. वाय पाटील, तालुकाध्यक्ष दशरथ पिष्ठे, मदन कारंडे, बी. के. चव्हाण, प्रकाश पाटील उपस्थित होते.

यावेळी महाविकास आघाडीचे सरकार असून आमची मदत करण्याची भूमिका असणार आहे. आता कोल्हापूर जिल्हयात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीमध्ये अधिक सदस्य कसे येतील असे काम करावे लागणार आहे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ताकद वाढविण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. कोल्हापूर जिल्हयात आणखी चांगली संघटना वाढवूया. इचलकरंजी, हातकणंगले या भागातील  प्रश्नांना दादांनी न्याय दिला आहे. राजीव आवळे यांचासारखा एक चांगला माणूस आपल्या पक्षात येत आहे त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले.

जे आज पक्षात प्रवेश करत आहेत त्यांची विविध विकासकामे करण्यासाठी मदत करु. राजीव आवळे हे जनसुराज्य पक्षाचे आता नाहीत त्यांनी पक्षाने तिकीट न दिल्यामुळे त्यांनी बंडखोरी करून अगोदरच राजीनामा दिला होता. त्यामुळे ते सध्या तरी अपक्ष आहेत. त्यांचा दांडगा संपर्क लक्षात घेता पक्षाला त्यांची चांगली मदत होणार आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. भाजपने धमक्या दिल्या होत्या. आणि प्रवेश करुन घेतला होता ते सर्व आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्याची सुरुवात आज राजीव आवळे यांच्या प्रवेशाने होत आहे असेही हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

आपलेपण राष्ट्रवादीत मिळालं आहे. भविष्यात राष्ट्रवादीचा उतराई होण्यासाठी राष्ट्रवादीशिवाय दुसरं काम करणार नाही असे स्पष्ट करतानाच २०२१ मध्ये राज्यातील मातंग समाजात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे आश्वासन माजी आमदार राजीव आवळे यांनी प्रवेश करताना दिले.येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा विचार पोचविण्यात कमी पडणार नाही. राष्ट्रवादीशिवाय आपल्याला यापुढे पर्याय राहणार नाही असेही राजीव आवळे यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!