Share

आयुक्तांनी आणि गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना बदल्यांची माहिती दिलीच नाही – फडणवीस

Published On: 

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या दहा पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या अवघ्या तीनच दिवसांत रद्द करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांना पूर्वीच्या ठिकाणी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्यात आली नव्हती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यातून उद्धव ठाकरेंनी आपली पॉवर दाखवली असून राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला अशी चर्चा आहे. मुंबईतील करोनाचा वाढता कहर लक्षात घेता राज्य शासनाच्या गृह विभागाच्यावतीने बदल्यांचे आदेश जारी केले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेनेतील समन्वयाच्या अभावामुळं या बदल्या रद्द करण्यात आल्या असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या निमित्ताने तयार झालेल्या स्थितीवरुन सरकारवर जोरदार टीका केली आहे. आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचा प्रयत्न सुरु आहे. त्यातूनच या बदल्यांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलीच गेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या बदल्या थांबवल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

“माझा जो अनुभव आहे त्या प्रमाणे पोलीस आयुक्तांच्या समितीला अंतर्गत बदलीचे अधिकार असतात. या बदल्यांबाबत आयुक्त गृहमंत्र्यांना माहिती देतात. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री स्वतंत्र असताना गृहमंत्री या बदल्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना देतात. यानंतर या बदल्या होतात. मात्र, या प्रकरणात आयुक्तांनी आणि गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना या बदल्यांची माहिती दिलीच नाही. नंतर हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी या बदल्यांना स्थगिती दिली.”

नेमकं काय आहे प्रकरण ?

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 2 जुलैला या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. हे सर्व अधिकारी हे मुंबई पोलीस दलातले असून DCP दर्जाचे आहेत. नुकतेच या सर्व 10 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश रद्द करण्यात आलेत आणि त्यांना पुर्वीच्याच ठिकाणी राहण्यास सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख आज संध्याकाळी उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. पोलिसांच्या बदल्या आणि लॉकडाऊन यावर या भेटीत चर्चा होऊन समन्वयाने काम कसे करता येईल याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊन काळात रस्त्यावर मौज मजा करण्यासाठी आलेल्या महाभागांना पोलिसांनी दाखवला इंगा

कोरोना संसर्गाचे प्रमाण देशात 6 तर मुंबईत 28 टक्के, फडणविसांनी व्यक्त केली चिंता

काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदाराचा परवाना रद्द

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!