नांदेड : जगभरात कोरोनामुळे बळी पडलेल्यांची संख्या 65 हजारावर गेली आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रात देखील कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केले आहे मात्र लोक त्याला फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.
संचारबंदी काळात सरकारी आदेशाच उल्लंघन करण, विलगीकरणात असताना बाहेर फिरण, मास्क न लावण या आणि अवैध दारू विक्री, जमाव जमविण या कारणांवरून रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात 84 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यापैकी 11 जण हे विलगीकरणात असताना बाहेर फिरत होते.रायगड जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 15 झालेली असल्याने पोलिसांनी संचारबंदीची अंमलबजावणी अधिक कडक करायला सुरूवात केली आहे.
नांदेड शहरात लॉकडाऊन काळात गेल्या दोन दिवसांत रस्त्यावर मौज मजा करण्यासाठी आलेल्या एक हजार सातशे गाड्यांवर नांदेड शहर वाहतूक शाखेन दंडात्मक कारवाई करत, अकरा लाख, तेरा हजार सहाशे रुपये महसूल वसूल केला आहे, अशी माहिती नांदेड शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिली आहे. या शिवाय ७२ दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
दरम्यान,वाशिम जिल्ह्यात जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं संचारबंदीच उल्लंघन करणाऱ्या तसेच विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर धडक कारवाई करत जिल्ह्यातील एकुण ३६ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे . एकुण १६ मोटार सायकलीही जप्त करण्यात आल्या आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

