Share

काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदाराचा परवाना रद्द

Published On: 

कऱ्हाड : वहागाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराने केलेला काळाबाजार समोर आल्यानंतर त्या दुकानदाराचा दुकान परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसावे देवकाते यांच्या आदेशावरून हि कारवाई करण्यात आली आहे.

वहागाव येथील स्वस्त धान्य दुकानदार गौतम ताटे हा धान्य वितरणानंतर शासन नियम नुसार कुठलीही पावती देत नव्हता तसेच ग्राहक यादी त्याच्याकडे नव्हती व दुकानातील धान्य साठ्या विषयी फलक देखील त्याने लावलेले नव्हते. पावती पुस्तक देखील त्याने शासनाकडे सादर केलेले नव्हते, साथ बुकसह विक्रीरजिस्टर मध्ये खाडाखोड होती. शासनाची सही देखील त्यावर नव्हती या अनेक त्रुटींसह दुकानाची वेळ तसेच सुटीचा दिवसही लोकांना माहित नव्हता त्यामुळे ग्रामपंचायतीने ठराव करून ताटे यांचा परवाना रद्द करण्याची मागणी केली होती. शासनाने केलेल्या तपासणीत या बाबी खऱ्या असल्याचे समोर आले होते.

कोरोनासारख्या संकटाच्या परिस्तितीतही ग्राहकांची अशा प्रकारे फसवणूक सुरु होत असल्याने ताटे यांच्या दुकान परवान्याची शंभर टक्के अनामत रक्कम जप्त करून दुकान परवाना रद्द करण्यात आला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!