मुंबई : संपुर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या दसरा मेळाव्याला काहीच तास शिल्लक राहिले आहेत. शिवसेना पक्षात दोन गट पडल्यामुळे आज शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचा आणि बीकेसी मैदानवर एकनाथ शिंदेंचा, असे दोन दसरा मेळावे होणार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हा पहिलाच दसरा मेळावा (Dussehra Melawa) असल्याने शिंदे गट जोरदार तयारी करत आहेत. मात्र, शिंदे गटाने पैसे देऊन गर्दी जमवलं असल्याचं समोर येतं आहे.
शिंदे गटाच्या मेळाव्याला आलेल्या लोकांना काही प्रश्व विचारण्यात आले होते. यावेळी लोकांना आपण कुठे चाललो आहोत हेच नाहिती नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे दस रा मेळाव्याला अनेक टीका टिप्पाण्या होण्याची शक्यता दिसून येत आहे.
एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्या आधी एक ट्विट केलं आहे. मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे, प्रसिद्ध लेखक हरिवंशराय बच्चन यांची ही म्हण शेअर केली आहे.
शिवसेनाच्या दसरा मेळाव्याने राज्यातील राजकरणात चांगलीच आफडा-तफड माजवली होती. सर्व पक्षातील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. एवढंच नाही तर हे प्रकरण कोर्टात देखील गेलं. मात्र, याचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला. त्यामुळे एकनाथ शिंदे गट मोठी गर्दी जमवण्यासाठी खाटापीट करत आहे.
दसरा मेळव्यासाठी बीकेसी मैदानावर येणाऱ्या शिवसैनिकांसाठी तब्बल अडीच लाख फुड पॅकेट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. ठाणयातील प्रशांत काॅर्नर नावाच्या मिठाईच्या दुकानवाल्याला ही ऑर्डर देण्यात आली आहे. शिंदे गटाकडून कमीत कमी ३ लाख कार्यकर्ते येणार असल्याचा अंदाज आहे.बीकेसी मैदानावर मेळावा संपल्यानंतर हे फूड पॅकेट्स दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रशांत कॉर्नरच्या कारखान्यात सध्या फूड पॅकेटस तयार करण्याची लगबग सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या :
- CM Eknath Shinde | दसरा मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदेंचं ट्विट, म्हणाले…
- Asaduddin Owaisi | “मोहन भागवत यांच्यासाठी आजचा दिवस…”; भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसींचा पलटवार
- Dasara Melava | “…अशा बाजारु लोकांना” ; विनायक राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
- shambhuraj desai । बीकेसीवरच सर्वात जास्त गर्दी पाहायला मिळेल; शंभूराज देसाईंचा विश्वास
- Dasara Melava | “बाळासाहेब असते तर यांच्या ढुंगणावर लाथ मारुन मिठी नदीत विसर्जण केले असते”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

