🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सुरवातीला पाठींबा दिला होता. त्यानंतर मात्र कॉंग्रेसने शिवसेनेच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्यामुळे शिवसेना कॉंग्रेसच्या दबावात असल्यची चर्चा सुरू होती. महाराष्ट्रातील सरकारवर शिवसेनेच्या भूमिकेमुळे परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात होतं.
मात्र भाजप नेते आशिष शेलार यांनी, सरकार वाचवण्यासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार आहे, अस म्हंटल आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ”नागरिकत्व सुधारणा विधेयक देशहिताचे आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देशहितासाठी हे विधेयक स्वीकारावं, हे विधेयक देशासाठी आवश्यक आहे. शिवसेनेनं आपला मूळ बाणा दाखवावा, कोणाला घाबरू नये.
ते पुढे म्हणाले, ” लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं शिवसेनेने समर्थन केले पण राज्यसभेत पळ काढला. सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका. नागरिकत्व सुधारणा विधेयकाची अंमलबजावणी देशासाठी आवश्यक आहे. घुसखोरांना घालवलंच पाहिजे.” तसेच कॉंग्रेसच देशात भारत बचाव आंदोलनावर टीका करताना भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका असून ही नौटंकी आहे. सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा हेतू कधीच नव्हता, राष्ट्र सर्वप्रथम हा भाजपचा अजेंडा असल्याचा टोला आशिष शेलार यांनी काँग्रेसला लगावला.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1205743939363332097?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1205748230085955585?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
