नाशिक : कोरोनाच्या काळात शेतकरी हा अडचणीत आला आहे. यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 1 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद शेतकऱ्यांच्या संकटासाठी पुरेशी नाही. शेतीमालाला हमीभावासह कर्जमुक्तीची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही, असे मत शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडगुले यांनी म्हटले आहे.
रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांसह अजित पवार यांच्यावरही केलं भाष्य म्हणाले…
हंसराज वडगुले म्हणाले की, शेतकऱ्यांना शेतात नांगर फिरवून शेतीमाल फेकून द्यावा लागत आहे. निर्यातबंदी तसेच देशांतर्गत बाजारपेठ सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना द्राक्ष देखील कवडीमोल भावात विकावे लागत आहेत. कांदा देखील मातीमोल भावात विकला जात आहे. शेतकऱ्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या मालाला हमीभाव देणे, नोटाबंदी, आस्मानी संकट, आर्थिक मंदीमुळे कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी, असे वडगुले यांनी व्यक्त केले आहे.
विधानपरिषद निवडणूक : भाजपच्या उमेदवाराने गुन्ह्य़ाची माहिती लपवली ? प्रतिज्ञापत्रावरून नवे वादळ
दरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारनं २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आणि त्याची दोन टप्प्यांती माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. आज सीतारामन यांनी अन्न प्रक्रिया उद्द्योगांसाठी, शेती, पशूपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स व्यवसायाबाबत पॅकेज जाहीर केले. शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. खाद्य पदार्शांशी संबंधित उद्योगांना १० हजार कोटींची मदतही जाहीर करण्यात आली आहे असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
‘मी तुमची सायकल घेत आहे, मला माफ करा’ मजुराचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल
इतर महत्त्वाच्या घोषणा केल्या…
औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी ४ हजार कोटींची मदत
पशुपालन आणि दुग्ध व्यवसायसाठी १५ हजार कोटींची तरतूद
पाळीव प्राण्यांच्या लसीकरणासाठी १३ हजार ३४३ कोटींची तरतूद
मत्स्य व्यवसायासाठी २० हजार कोटींची तरतूद
अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १० हजार कोटींची तरतूद
मधमाशी पालन व्यवसायासाठी ५०० कोटींची तरतूद
भाजीपाला वाहतुकीवर ५० टक्के सबसिडी
लॉकडाउनच्या काळात भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’
आज ११ घोषणा करण्यात आल्या ज्यापैकी ८ कृषी क्षेत्राशी होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. यात कोणत्या क्षेत्राला काय मिळालं याच्या घोषणा तीन दिवस करण्यात येत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेचा आजचा तिसरा दिवस आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
