नवी दिल्ली- केंद्र सरकारने आज आणखी 43 मोबाइल अॅप्सवर बंदी घातली. या अॅप्सच्या माध्यमातून राष्ट्राचं सार्वभौमत्व, अखंडता, सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचवली जात आहे; अशी माहिती मिळाल्यानंतर ईलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला.
भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्रानं दिलेल्या विस्तृत अहवालाच्या आधारे मंत्रालयानं हे पाऊल उचललं असून यापूर्वीही केंद्र सरकारनं एकंदर 177 अॅप्स वर बंदी घातली आहे. भारत सरकारकडून इंडियन युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा तसेच राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी चायनीज अॅप्सची अॅक्टिविटी मॉनिटर करीत आहे.
सरकारकडून याआधी २०० हून जास्त चायनीज अॅप्सवर बंदी घातली गेली आहे. बंदी घालण्यात आलेल्या अॅप्समध्ये Baidu, WeChat Reading, Ludo All Star पासून PUBG Mobile, PUBG Mobile Lite यांचा समावेश आहे. तसेच भारतात सर्वात प्रसिद्ध शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे.
Govt of India blocks 43 mobile apps from accessing by users in India, under section 69A of the Information Technology Act. Action taken based on inputs regarding these apps for engaging in activities prejudicial to India's sovereignty, integrity, defence, security & public order. pic.twitter.com/ACVffY3SKF
— ANI (@ANI) November 24, 2020
आयटी कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. बंदी घातलेले सर्व अॅप्स भारताच्या सार्वभौमत्व, अखंडता, संरक्षण, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपात कामाची कदर नाही,राष्ट्रवादीत प्रवेश करुन मोकळा श्वास घेतोय : जयसिंगराव गायकवाड
- ‘मंदिर विषयावर शुद्र राजकारण करणं योग्य नाही,पण निराशा ही माणसाला स्वस्थ बसू देत नाही’
- ‘गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने जुन्या योजनांना केवळ स्थगिती देण्याचं काम केले’
- पदवीधर मतदारांना 1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तीक रजा
- 69 हजार पेट्रोल पंपांवर किमान एक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग किऑस्क स्थापन केले जाणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

