Share

नोटाबंदीच्या घिसडघाईबद्दल केंद्राने देशाची माफी मागावी- संजय राऊत

Published On: 

नवी-दिल्ली : पाच वर्षापूर्वी आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चलणातील नोटा बंद केल्या होत्या. नोटाबंदीमुळे काळं धन संपूष्टात येईल तसेच आतंकवाद, भ्रष्ट्राचाराला आळा बसेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना राऊत म्हणाले की,’नोटाबंदीच्या निर्णयानंतर आज पाच वर्षात काश्मीरमध्ये सर्वाधिक दहशतवाद वाढला आहे. याच पाच वर्षात देशात सर्वात जास्त काळापैसा वाढला आहे. त्यामुळे नोटाबंदी पूर्ण अपयशी ठरली आहे. नोटाबंदीचा निर्णय हा आर्थिक डिजास्टर होता. नोटाबंदी झाल्यावर शेकडो लोकांना नोकरी आणि प्राण गमवावा लागला होता. त्यामुळे नोटाबंदीच्या घिसडघाईबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मगाायला हवी’, असे ते म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातून केंद्र सरकार उखडून फेका असं आवाहन केलं आहे. नड्डा यांच्या आवाहनाची राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. जेपी नड्डा सदगृहस्थ आहेत. चांगले नेते आहेत. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचं सरकार उखडून फेका. त्याच्याआधी त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये चीन जे घुसलं आहे आणि चीनने आपल्या हद्दीत गावं बसवली आहेत. त्यांनी सर्वात आधी अरुणाचलप्रदेशातून चीनला उखडून फेकलं पाहिजे. जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले वाढले आहेत. अतिरेक्यांचे अड्डे वाढले आहेत. त्यांना ताबडतोब उखडून फेकलं पाहिजे.’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!