Share

कार चालकाला हृदयविकाराचा झटका; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधानबद्दल,कार्यतत्परतेबद्दल होत आहे कौतुक

Published On: 

तुळजापूर –उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगावधान राखत चालकाला दवाखान्यात दाखल करून जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांनी कारचा ताबा घेतला आणि दोन किलेामीटर ड्रायव्हिंग करत ऑफिसला पोहोचल्या.

जिल्ह्यातील काही खासगी दवाखाने कोरोना रुग्णांना उपचार देण्यास असमर्थता दर्शवत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मुधोळ-मंुंडे यांनी अशा दवाखान्यांना कारवाईसंदर्भात नेाटिसा बजावून अचानक भेटी देऊन कारवाईचाही इशारा दिला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत संलग्न काही खासगी दवाखान्यांना सोमवारी जिल्हाधिकारी यांनी भेटी दिल्या. त्या सह्याद्री हॉस्पिटल तसेच सुविधा हॉस्पिटलमध्ये गेल्या. सुविधा हॉस्पिटलमध्ये भेट दिल्यानंतर गाडीत बसून कार्यालयाकडे जाताना त्यांच्या कारचे चालक जवळगे यांना हृदयविकाराचा झटका आला.

त्याला सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांनी स्वत: कार चालवत दोन किलेामीटर ड्रायव्हिंग करत ऑफिसला पोहोचल्या. जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांच्या प्रसंगावधानाबद्दल आणि कार्यतत्परतेबद्दल कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला

IPL सुरू होण्याआधी ‘या’ संघाविरूद्ध खेळणार टीम इंडिया?

शरद पवारांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरु,’सिल्व्हर ओक’वर पाठवणार १० लाख पोस्टकार्ड

गुड न्यूज : भारताच्या कॅडिला हेल्थकेअरनं केला कोविड – १९ वर लस बनवल्याचा दावा

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!