Share

जेव्हा खासदार मुंडे डॉक्टर म्हणून रुग्णालयात जातात!

Published On: 

🕒 1 min read

बीड : राज्यात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढीमुळे आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांना मदतीचे आवाहन केले आहे. आरोग्य यंत्रणेवरील वाढलेला भार पाहता, अनेक आरोग्य कर्मचारीही स्वत: पुढे आले आहेत. त्यातच भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी देखील जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांची पाहणी केली. तसेच त्यांच्याशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा देखील घेतला.

या संबंधी डॉ. प्रीतम मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील भार वाढला आहे, आज जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.तसेच रुग्णांशी संवाद साधून लिक्विड ऑक्सिजन प्लांट आणि स्वयंपाक गृहाची पाहणी केली.’

डॉ. प्रीतम मुंडे या त्वचारोग तज्ज्ञ आहेत. वास्तविक भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे अकस्मात निधन झाल्याने राजकारणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे राजकीय जीवनात सक्रीय झाल्याने त्यांना प्रॅक्टिस करण्यास जास्त वेळ मिळत नाही. मात्र, अशा संकटाच्या प्रसंगी रुग्णांना धीर देण्यासाठी त्यांनी थेट पीपीई कीट घालून कोरोना रुग्णांशी संवाद साधला. सध्या महाराष्ट्राला प्रॅक्टिस करत नसलेल्या अशा अनेक डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!