🕒 1 min read
चेन्नई : मगंळवारी झालेल्या आयपीएलच्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारत कोलकाता नाइट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबत मुंबईने या मोसमातील आपल्या पहिल्याच विजयाची नोंद केली आहे. तसेच कोलकाताविरुद्ध विजयाची पंरपरा कायम ठेवली आहे.
या सामन्यात आखेरचे आणि निर्णायक षटक हे ट्रेन्ट बोल्टने टाकले होते. आखेरच्या षटकात केकेआरला विजयासाठी १५ धावांची गरज होती. आखेरच्या षटकात ट्रेंट बोल्टने आंद्रे रसल आणि पॅट कमिन्स या दोघांना बाद करत केवळ ४ धावा दिल्या आणि मुंबईचा विजय साकार केला. या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने बोल्टची मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान बोल्टने सुर्यकुमारच्या एका प्रश्नाचे उत्तर देत हिंदीतून देत ‘बहुत अच्छा’ असे म्हणाला.
⚡ 'बहुत अच्छा' ⚡@trent_boult describes his experience to @surya_14kumar after defending 15 runs from the last over ????????#OneFamily #MumbaiIndians #MI #IPL2021 #KKRvMIpic.twitter.com/vuoEHVlg9N
— Mumbai Indians (@mipaltan) April 14, 2021
मुंबई इंडियन्सनने ट्विटर हँडलवर या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुर्यकुमार ट्रेन्ट बोल्टला हिंदीत प्रश्न विचारतो,’शेवटच्या षटकात १५ धावांचा बचाव करताना तुला कसे वाटले?’. यावर बोल्टने ‘लास्ट ओव्हर’ म्हणत एका क्षणानंतर ‘बहुत अच्छा’ म्हणजे शेवटचे षटक.. खुपच छान वाटले असे म्हणाला. हिंदीतील उत्तराने बोल्टच्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची मने जिंकली. त्यांच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस, वीज कोसळून शेतकरी ठार
- ‘देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का?’
- बीडमध्ये धुम स्टाईल चोरी, चालत्या टेम्पोतून ७२ हजारांचे एलईडी गायब
- पुण्यातील सोसायट्यांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना ‘नो एन्ट्री’, महापालिकेचा आदेश
- ‘जयंत पाटील यांच्या सभेत पाऊस आला आणि विरोधकांनी त्याचा धसकाच घेतला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

