Share

वेरूळ घाटातील वनक्षेत्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

Published On: 

औरंगाबाद : वेरूळ घाटातील वनक्षेत्रात चांगोबा घाट परिसरात सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज वैद्यकीय अधिका-यांनी वर्तविला आहे.

वेरूळ मार्गावर असलेल्या चागोबाघाट परिसरातील गट नंबर १४४ मध्ये एक छोटा धबधबा असून या ठिकाणी सोमवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना गुराख्यांना दिसला. त्यांनी ही माहिती वेरूळचे पोलीस पाटील रमेश ढिवरे यांच्यामार्पâत खुलताबाद पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिली.

ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्यासह यतीन कुलकर्णी, बिट जमादार रमेश छत्रे, आर.एस.वारे, विजय गायकवाड, शेख जाकीर, जगन्नाथ बळी, सामाजिक कार्यकर्ते मसियोद्दीन सौदागर हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळीच मृतदेहाचे डॉ.श्रीकांत तुपे यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणी खुलताबाद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!