Share

क्रिकेट स्टेडियमला मोदींचे नाव दिल्यावर महाराष्ट्रातील नेत्यांनी भाजपवर उठवली टीकेची झोड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. यापूर्वी या स्टेडियमचं नाव मोटेरा स्टेडियम होतं. ते बदलून आता नरेंद्र मोदी स्टेडियम हे नवं नाव असेल, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या नावाच्या कोनशिलेचं उद्घाटन केलं.

या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे देखील उपस्थित होते. अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम 700 कोटींहून अधिक खर्च करुन बांधले आहे. यामध्ये 1,10,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड स्टेडियम तयार करणाऱ्या कंपनीने हे स्टेडियम डिझाइन केले आहे.

दरम्यान, मोदींचे नाव स्टेडियमला दिल्यानंतर कालपासून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. या नामकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर उपोधारिक टीका केली आहे. ‘आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले’ आहेत, असा उपरोधिक निशाणा राऊत यांनी मोदींवर साधला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींना मृत्यूनंतर आपल्याला कोणी लक्षात ठेवणार की नाही याबद्दलची खात्री नसल्यानेच स्टेडिअमला आपलं नाव दिल्याची टीका केली आहे.’काय नेता मिळाला आहे देशाला. यांना लोक आपल्याला विसरुन जातील याची चिंता आहे. यांचा लोकांवर विश्वास नाही, की मृत्यूनंतर कोणी आपल्याला लक्षात ठेवेल की नाही. म्हणून मृत्यूआधी स्टेडियम आपल्या नावे करुन घेतलं,’ अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

‘नरेंद्र मोदींच्या नावाने ज्या स्टेडियमचं नामकरण करण्यात आलं आहे त्याचं नाव आधी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने होतं. भारतरत्नाच्या नावाचा असा बदल करणं हे कुठेतरी सर्व भारतरत्नांचा अपमान केल्यासारखं आहे. हे अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करत आहे. देशातील जनता हा निर्णय सहन करणार नाही’, असं मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय.

राष्ट्रवादी चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक ट्वीट करून मोदींची तुलना हिटलरशी केली आहे. ‘स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले… हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते.’ असे ट्वीट आव्हाड यांनी केले आहे.’

‘गुजरातमधील मोटेरा रोडवरील सरदार पटेल यांच्या नावाने असलेले स्टेडियम १९८३ साली तत्कालीन सरकारने निर्माण केलेले आहे. गांधीवादी असलेल्या सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभारून त्यांचे कोणतेही विचार मान्य नसलेल्या नथुरामवादी भाजपला आता सरदार पटेलांचीच अडचण वाटत असावी म्हणून स्टेडियमला त्यांचे नाव बदलून आज महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियम असे नामकरण करण्यात आले आहे’, असा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे.

दरम्यान,या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय.या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं नावं सरदार पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह असं आहे. संकुलातील क्रिकेट स्टेडियमला फक्त पंतप्रधान मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. ज्या परिवाराने सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा सन्मान केला नाही. ते आता रडत आहेत’, अशा शब्दात जावडेकर यांनी गांधी परिवार आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!