उस्मानाबाद : चहा वाला काय करु शकतो हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवुन दिले. अशाच एका चहावाल्याच्या मुलाने उस्मानाबाद जिल्ह्याला योगा स्पर्धेत पहिले वहिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते. तसेच जिल्ह्यातुन राष्ट्रीय योगा स्पर्धेत पोहोचणारा तो एकमेव खेळाडु ठरला आहे. रुद्राक्ष बिराजदार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. राज्यस्तरीय योगा स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक मिळवले आहे.
आदर्श महाविद्यालयात १२ वीचे शिक्षण घेणारा रुद्राक्ष बिराजदार हा परिस्थीतीने गरीब आहे. त्याचे वडील विजयकुमार बिराजदार शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील फुटपाथवर टपरी ठेवून चहा विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कौटुंबिक स्थिती बिकट असुनही रुद्राक्ष बिराजदार याने शहरातील डॉ. के. डी. शेंडगे स्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, यादरम्यान त्याला योगाची आवड निर्माण झाली. महाराष्ट्र योगा असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय योगा स्पर्धा होणार असल्याची माहिती त्याला मिळाली. यानंतर रुद्राक्षने योगा स्पर्धेची तयारी केली. ६ डिसेंबरला झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन योगा स्पर्धेत १८ ते २१ वयोगटातून स्पर्धेत राज्यातून २१० स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धेत रुद्राक्षने दैदीप्यमान यश संपादन करत उस्मानाबाद जिल्ह्याला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर झालेल्या ऑनलाईन योगा स्पर्धेत सहभागी होवून जिल्ह्यातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत त्याचे पदक थोडक्यात हुकले. आदर्श महाविद्यालयात १२ वीचे शिक्षण घेत त्याने स्वतःचे योगा लाइफ फिटनेस केंद्र सुरू केले. यातून अन् स्पर्धेतून मिळवलेल्या बक्षिसाच्या रकमेतून सकस व पौष्टिक आहार घेत असतो. घरातील परिस्थितीमुळे त्याला व्यवस्थित खुराकही मिळाला नाही. यामुळे बक्षिसाच्या रकमेवरच त्याला भागवावे लागत होते.
महत्वाच्या बातम्या
- जिल्हा शल्यचिकित्सकांकडून मानसिक त्रास, महिला वैद्यकिय अधिकाऱ्याची तक्रार
- ‘राजकीय कुरघोडीसाठी इतका करंटेपणा कुठून येत असेल?’
- ‘समोरच्याला टाकून बोलणं, लागून बोलणं आमची संस्कृती नाही’
- कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण
- फडणवीसांनी घेतलेल्या आणखीन एका निर्णयात ठाकरेंकडून बदल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
