Share

मनसे-भाजप युतीची नांदी ; राज ठाकरेंनी टाकले एक पाऊल पुढे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपा आणि मनसे युतीबाब राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी यावर भाष्य देखील केले आहे. मात्र युती करतांना पक्षांचे विचार आणि भूमिका जुळणं फार महत्वाचं असतं. मनसेचा परप्रांतीयांसदर्भात असलेल्या भूमिकेवर नेहमी प्रश्न उपस्थित होतात. तसेच यापुर्वी मनसेने परप्रांतीयांविरोधातील भूमिका बदलली तर भाजप त्यांना सोबत घेऊ शकतो. राज हे आश्वासक आहेत. युतीबाबतचा निर्णय पक्षीय पातळीवर विचारांती होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

मनसे आणि भाजप आगामी काळात युती करतील अशा चर्चा रंगत असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या मुलाखतीची एक लिंक पाठवली आहे. मनसेशी युती करायला आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही पण राज ठाकरे यांनी परप्रांतियांच्या विरोधातील भूमिका बदलायला हवी असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं होतं. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीतची लिंक चंद्रकांत पाटील यांना पाठवली आहे. त्यामुळे आता मनसे-भाजप युतीची नांदी झाली असे म्हणले तरी हरकत नाही.

नाशिक भेटीत राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत मनसेच्या परप्रांतीयांच्या भूमिकेवर चर्चा झाली. ‘तुमच्या मनातील संभ्रम लवकरच दूर करतो. परप्रांतीयांची भूमिका स्पष्ट करणाऱ्या मुलाखतीची लिंक लवकरच तुम्हाला पाठवतो,’ असं राज यांनी पाटील यांना सांगितलं होते. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी त्यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी हे एक पाऊल पुढे टाकल्याचे चित्र दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!