Share

आयपीएल स्पर्धेबाबत ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केला. यामुळे बीसीसीआयने ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगीत करावी लागली. यानंतर काही दिवसातच उर्वरीत स्पर्धा युएई येथे आयोजीत करण्याची घोषणा बीसीसीआयने केली.

यादरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही दिवसापासुन आयपीएल की राष्ट्रीय संघ असा वाद उभा राहिला होता. भारतातील कोरोना परिस्थीतीमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होण्यापासून रोखले होते. मात्र बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयपीएल स्पर्धेबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल स्पर्धेत खेळयाचे का नाही हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना दिले आहे. यापुर्वी न्युझीलंड क्रिकेट बोर्डांने असा निर्णय दिला होता. त्यामुळे न्युझीलंडचे खेळाडू पाकिस्तान दौरा डावलुन आयपीएल स्पर्धेत खेळणार आहे.

उर्वरीत स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झाली तेव्हा स्पर्धेत विदेशी खेळाडू नसणार अशी चर्चा सुरु होती. कारण सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अनेक देशांचे आंतरराष्ट्रीय दौरे होते. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा विदेशी खेळाडूंच्या अनुपस्थितीत पार पडणार अशी परिस्थीती निर्माण झाली होती. मात्र जशी स्पर्धा जवळ येऊ लागली. तशे प्रत्येक देशाच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धेत विदेशी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!