टीम महाराष्ट्र देशा – पुलवामा देशावरील सर्वात मोठा दहशदवादी हल्ला आहे, हा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. गेल्या 5 वर्षात सर्वात जास्त अतिरेकी हल्ले होऊन त्यात मोठ्या प्रमाणात जवान शहीद झाले आहेत, तर अनेक निरपराध नागरिकांचे बळी गेल्याचे मत छगन भुजबळ यांनी मांडले. एका कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते.
पुलवामा आतापर्यंतचा देशावरील सर्वात मोठा हल्ला आहे, आणि गुप्तचर यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेचं हा हल्ला झाला आहे अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली. हल्ला होणार अशी माहिती असतांना काळजी का घेण्यात आली नाही. एवढ्या मोठ्या संख्येने एकाच कॅनवायमध्ये जवानांना नेणे चुकीचे आहे, मात्र असे असले तरी या घटनेत आम्ही सरकार व सैन्याबरोबर आहोत. या हल्ल्याचा एकत्रिपणे मुकाबला करण्याची आवश्यकता आहे असे मत भुजबळ यांनी मांडले.
यावेळी नोटबंदीवर बोलताना ते म्हणाले देशात नोटाबंदी करण्यात आली, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. उलट आतंकवादी हल्ले वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यापुढे पाकिस्तानवर जागतिक दबाव आणावा व व्यावसायिक संबंध तोडण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. तसेच एकीकडे जवानांचे कुटुंबिय व देशवासीय आक्रोश करीत होते त्याचवेळी पंतप्रधानांसह भाजपची मंडळी उदघाटन करण्यात मश्गुल असल्याचे सांगत या विषयी भुजबळांनी नाराजी व्यक्त केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

