कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत. शिवसेनेचे नाशिकमधील शहाराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता या वादाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहे. अनेक ठिकाणी शिवसेना-भाजप आमने-सामने आले असून पोलिसांनी समजूत काढल्यानंतरही कार्यकर्त्यांनी न ऐकल्याने विविध शहरांमध्ये पोलिसांना लाठीचार्ज करावा लागत आहे. दरम्यान, कोल्हापुरातील कागल तालुक्यात नारायण राणे यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. कागल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून तो जाळण्यात आला. यावेळी राणेंच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते ?
‘देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही’, असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोंबडीचोर’! नारायण राणेंच्या विरोधात औरंगाबाद येथेही तक्रार दाखल
- मुख्यमंत्र्यांचा अपमान हा त्यांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे – राष्ट्रवादी
- सिंहाच्या नव्हे उंदराच्या बिळाखाली येऊन दाखवलं, तुम्ही काय केलंत? सरदेसाईंचा नितेश राणेंना सवाल
- ‘खऱ्या आईचं दूध पिलं असेल तर समोर या, तुमची औकात दाखवून देऊ’, निलेश राणेंचा इशारा
- पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेला तात्पुरती स्थगिती

