उस्मानाबाद : विद्यार्थ्यांना आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महाविकास आघाडी सरकारने डोकं असलेला आरोग्यमंत्री नियुक्त करावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी केली आहे. भारतीय जनता युवा मोर्चा वतीने राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या वतीने आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.
दिनांक २५ व २६ सप्टेंबर २०२१ रोजी आरोग्य विभागाची वर्ग क आणि ड पदांसाठीची होणारी परीक्षा आदल्या दिवशी रात्री अचानक रद्द करण्याचा दुर्दैवी निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाविरुद्ध राज्यभरात विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. असा आराेप करत यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.
राज्य सरकारने पुढील दोन दिवसात परीक्षेची पुढील तारीख जाहीर करावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मदत करावी. गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला, याची भरपाई म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपच्या मस्ती चढलेल्या आमदारावर गुन्हा दाखल करा, नाहीतर…; मनसेचा आक्रमक इशारा
- ओबीसींच्या हक्कासाठी लढणाऱ्यांना त्रास दिला जातोय – छगन भुजबळ
- देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ
- ‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा
- ‘अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद नको, त्याचा फटका तुम्हालाही बसणार’, मोदींचा पाकिस्तानला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
