मुंबई : आझाद मैदानावरील आंदोलनकर्त्यांचे प्रश्न कधी सोडवणार? असा प्रश्न आज विरोधी पक्षनेते आमदार विनायक मेटे यांनी विधिमंडळ कामकाजावेळी मांडला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिल्यानंतर आझाद मैदानावरील आंदोलकांनी हे आंदोलन स्थगित केल्याची माहिती एबीपी माझा’ने दिली आहे.
शासनाच्या विविध विभागाच्या परीक्षांत उत्तीर्ण होऊनही मराठा समाजातील साडेतीन हजार उमेदवारांना तीन वर्षांपासून नियुक्त्या मिळाल्या नाहीत. त्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानावर अनेक उमेदवार जानेवारी २०२० पासून आंदोलन करत होते. दरम्यान, आझाद मैदानावरील या आंदोलकांच्या आरक्षणाचा मुदा आज विधिमंडळाच्या कामकाजात मांडण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते आमदार विनायक मेटे यांनी आझाद मैदानावरील आंदोलनकर्त्यांचे प्रश्न कधी सोडवणार? असा प्रश्न विचारला.
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले. ‘ आझाद मैदानावर हे तरुण उपोषणाला बसले आहेत त्याच्याशी मी गेल्या आठवड्यात चर्चा केली. त्यांच्याशी मी विस्ताराने चर्चाही केली. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायलयात प्रलंबित आहे आणि कायदेविषयक सल्ला घेतल्यानंतर आरक्षणाचा जो मूळ विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्या आरक्षणाच्या गाभ्याला धक्का लागू नये. यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली होती. या बैठकीत आरक्षणासाठी मार्ग कसा काढायचा, या विषयावर यावेळी चर्चा झाली. मात्र हा केवळ राज्यसरकारच्या हातातील विषय नाहीये. तरीही सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करत असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
तथापि राज्य सरकारने जरी आरक्षणाचा मुद्दा मान्य केला असला तरी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा मुद्दा टिकला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयातील मुद्दा प्रलंबित असल्यामुले एवढ्यात या विषयला हात लावता येणार नाही. तरीही या विषयावर कायदेविषयक तज्ञांची बैठक घ्यायया आपण तयार आहोत. तसेच आपण सार्वजन मिळून एक धोरण ठरवून ते सर्वोच्च न्यायलयात मांडू. असेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र आझाद मैदानावर आंदोलन करून प्रश्न सुटणार नाही. आणि तुम्हीही स्वतःला त्रास करून घेऊन नका. असे आवाहन केल्यानंतर आज या आंदोलकांनी हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
