🕒 1 min read
मुंबई : अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे गुरुवारी निधन झाले आहे. मुंबईतील कूपर हॉस्पिटलने सिद्धार्थच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. 40 वर्षीय सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या बातमीनंतर सर्वांनाच धक्का बसला. मनोरंजन क्षेत्रात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. काल दुपारी ३ वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक सेलीब्रीटी उपस्थिती राहिले होते. मात्र यानंतर अभिनेत्री गौहर खानने सिद्धार्थच्या कुटुंबीयांचं सांत्वन केल्यानंतर माध्यमांना मुलाखती देणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.
Any one who has met a grieving family ,should not give out details .Really sad to see people giving interviews about family members n sharing details .Stop !Please stop ! If Uve gone to pay ur respect don’t come out n become a khabri and add to the low standard of journalism ????????
— Gauahar Khan (@GAUAHAR_KHAN) September 3, 2021
याविषयी तिने लिहिले की, ‘सिद्धार्थच्या कुटुंबीयांचं सांत्वन केल्यानंतर बाहेर येऊन माध्यमांना त्यांच्याबद्दलची माहिती देत बसू नये. माध्यमांना मुलाखती देऊन त्याच्या कुटुंबीयांच्या बाबतीत माहिती देणाऱ्यांविषयी मला वाईट वाटतं. कृपया हे थांबवा. जर तुम्ही अंत्यविधीला गेला आहात तर बाहेर येऊन ‘खबरी’ बनू नका’, अशा शब्दांत गौहरने काही सेलिब्रिटींना सुनावले आहे.
सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारवेळी अली गोनी, असिम रियाज, राहुल महाजन, संभावना सेठ, विकास गुप्ता, अभिनव शुक्ला, करणवीर बोहरा, शेफारी जरीवाला उपस्थिती होत. यावेळी सिद्धार्थची आई आणि मैत्रीण शेहनाजची अवस्था मन हेलावणारी असल्याचे पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटलांच्या नावाने वनविभागाची २०० कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न
- इंधन दर कमी करण्याची किल्ली अजित पवारांकडेच आहे – चंद्रकांत पाटील
- ‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत’ ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

