Share

‘..यामुळेच बारकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष’, भाजपची टीका

Published On: 

मुंबई : एकीकडे राज्य सरकारने पायी वारीला परवानगी दिली नाही राज्यात अजूनही निर्बंध कायम आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आहे. त्यातच ऐका वृत्तवाहिनीने ठाण्यात स्टिंग ऑपरेशन केले असता ठाणे शहरात बार सुरू असल्याचे समोर आले आहे. यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्राचा विकास नाही तर टक्केवारी आणि वाझे या सरकारचे सूत्र असताना वेगळ काय होणारं? १०० कोटीचे टार्गेट पूर्ण करायचं असेल तर बारमध्ये काय चालत याकडे दुर्लक्ष कराव लागणार ना महाआघाडी सरकारला. अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत असून ठाण्यात बार कोणाच्या आशीर्वादाने चालतात असा सवाल उपस्थित केला जात आहे.

डान्स बारप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि दोन एसीपी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. चारही अधिकाऱ्यांची त्यांच्या सध्याच्या पदावरून काढून कंट्रोल रूमला बदली केली आहे. अतिरिक्त आयुक्तांना या सर्व प्रकरणाची चौकशी करून 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!