🕒 1 min read
मुंबई- कॉंग्रेस नेत्या व उद्धव ठाकरे सरकारमधील महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तब्बल आठ वर्ष जुन्या प्रकरणात ठाकूर यांना ही शिक्षा झाली आहे.
पोलीस कॉन्स्टेबलवर हात उचलणे यशोमती ठाकूर यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे.ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिर परिसरात पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना २४ मार्च २०१२ रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि रुपये १५ हजार दंड आकारण्यात आला आहे.सोबतच त्यांचा कार चालक आणि दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले आहेत. फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला आहे.
गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री @AdvYashomatiINC यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता पण 'खिसे गरम' करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 16, 2020
दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या संदर्भात मार्मिक अशी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात,गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता पण ‘खिसे गरम’ करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?असा टोला देखील वाघ यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- पवार कुटुंबियावर टीका केल्याशिवाय हेडलाइन्स होत नाहीत : सुप्रिया सुळे
- महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांना आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- ‘पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने भारतापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे कोरोना परिस्थिती हाताळली’
- ‘पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना मंत्री मंडळात राहण्याचा अधिकार नाही’
- जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवर अजित पवारांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
