टीम महाराष्ट्र देशा : नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेने घेतलेल्या ठाम विरोधी भूमिकेनंतरही नाणार रिफायनरी समर्थनासाठी डोंगर तिठा (ता. राजापूर) येथे आयोजित मेळाव्याला मोठी गर्दी झाली आहे. यावेळी असंख्य स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व विविध संघटनांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली.
काल नाणार रिफायनरीचा विषय संपलेला आहे, काही झाले तरी नाणार प्रकल्प होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या कात्रादेवी येथील सभेत मांडली होती. यावेळी त्यांनी शिवसेना जिल्हा परिषद सदस्य मंदा शिवलकर यांची हकालपट्टी केल्याचेही राऊत सांगितले.
यावेळी प्रकल्पाला शिवसेनेकडून जोरदार विरोध आहे हे स्पष्ट करत खासदार विनायक राऊत यांनी तर समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांना झोडून काढण्याचा इशारा जाहीर सभेत दिला होता. मात्र, राजापूरमधील आजच्या समर्थनाच्या सभेमध्ये शिवसैनिक टोप्या आणि गमछे घालून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
आता भाजपाचे माजी आमदार आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी ठाकरे घराण्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रमोद जठार म्हणाले, ‘नाणार रिफायनरीला विरोध असल्याचे आणि ती होणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे येऊन सांगून गेले. पण याच ठाकरे बंधुंच्या नातेवाईकांनी नाणारला लागणारी जमीन खरेदी केली आहे, हिंमत असेल तर पहायला या पुरावे दाखवतो, असा गंभीर आरोप जठार यांनी केला.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

