नंदुरबार – राज्यातील पूरग्रस्त भागात मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारनं 11 हजार 500 कोटीं रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना नुकताच पावसाचा जोरदार तडाखा बसला होता. अतिवृष्टी आणि पुरामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवित तसंच, वित्तहानी देखील झाली.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी अशी मागणी विरोधकांकडून सातत्यानं केली जात होती. त्यावर मी पॅकेज जाहीर करणारा नाही मदत करणारा मुख्यमंत्री आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी सोमवारी लगावला होता मात्र अखेर मंगळवारी पॅकेजच जाहीर झालं. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वार्ताहरांना त्याबाबतची माहिती दिली.
दरम्यान, ही मदत जाहीर झाल्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुरग्रस्तांसठी जाहीर केलेल्या पॅकेज बाबत विचारले असता आशिष शेलार म्हणाले, मी पँकेज देणारा नाही तर मदत करणारा अस मुख्यमंत्री म्हणाले होते पण ते शब्दावर फिरले का? याआधी तौक्ते आणि निसर्ग वादळावेळी घोषित केलेल पँकेज अजून जनतेला पोहोचलच नाही. तातडीची १० हजाराची मदत मिळालेली नाही अशी अवस्था आहे. घोषित होत पण पोहोचत नाही अस ठाकरे सरकारच पॅकेज असतं. या संकटाची व्याप्ती ही अजून सरकारच्या लक्षात आलेली नाही. जनतेला मदत मिळावी हीच आमची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘वर्क फ्रॉम होम, खरेदीला वेळ देणार कोण’! पुण्यात व्यापाऱ्यांचे घंटानाद आंदोलन
- टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक, पहिल्याच प्रयत्नात यशस्वी
- टीम इंडियात रहाणेविरुद्ध रचला जातोय कट? गावसकरांनी केला आरोप
- लेखापाल मारहाण प्रकरण, शिवसेना खा.भावना गवळी अडचणीत
- काँग्रेसची शिवसेनेवर पुन्हा कुरघोडी; शिवसेनेच्या माजी राज्यमंत्र्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

