Share

ठाकरे सरकार चार वर्षे चालणार नाही, पुन्हा निवडणूक घेतल्यास भाजपचं विजयी होणार : पाटील

Published On: 

पुणे : भाजपला धक्का देत शिवसेनेने ऐनवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापना केली. यानंतर, या विसंगत विचारधारा असलेल्या पक्षाचे सरकार फार काळ टिकणार नाही अशी टीका भाजप नेत्यांनी केली.

आता, या सरकारला वर्षपूर्ती होत आली असून अनेक संकटांना सामोरं जावं लागलं आहे. काँग्रेस नेत्यांची नाराजी, शिवसेनेतील स्थानिक नेत्यांची बंडखोरी, राष्ट्रवादीच्या मुत्सद्देगिरीचा आरोप देखील या काळात करण्यात आला. त्यामुळे आघाडीत बिघाडी असल्याचं वारंवार समोर आलं पण राज्य पातळीवरील नेत्यांनी सरकारला स्थिर ठेवले.

दरम्यान, आज भाजपतर्फे पुणे पदवीधर मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे. आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे, मात्र हे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, म्हणजे काय तर ते गुलदस्त्यात आहे, त्यावर भाष्य करायला मी भविष्यकार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. पुन्हा निवडणूक घेतली तर भाजप निवडून येईल, असा विश्वासही चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!