Share

‘ठाकरे सरकार क्रिसमसच्या आधीच मंत्रिमंडळ विस्तार करणार’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन महिना होईल तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. केवळ सहा मंत्र्यांमध्येचं तात्पुरते खातेवाटप करण्यात आले आहे. मात्र ठाकरे सरकार क्रिसमसच्या आधीच मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याची माहिती कॉंग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी दिली आहे.

काँग्रेस नेते हुसेन दलवाई आज औरंगाबादमध्ये होते, यावेळी त्यांनी सायंकाळी पत्रकारपरिषदेत मंत्रिमंळड विस्ताराबाबत माहिती दिली. मंत्रिमंडळावरून महाविकासआघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचेही दलवाई यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवाय, 25 डिसेंबर अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळ विस्तार करतील असे त्यांनी सांगितले.यावेळी दलवाई यांनी हे सरकार पाच वर्षेच नाहीतर आगामी 25 वर्षे टिकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

राज्यात तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले असले तरी आता त्यातील मतभेद समोर येत असल्याचं दिसत आहे. खातेवाटपा वरून मतभेद होत असल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्याचं दिसत आहे.दरम्यान, महाविकासआघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार 24 डिसेंबर रोजी होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1208655938413981697?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1208655144864251904?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!