ठाणे : डोंबिवलीतील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण गंभीर आहे. या पीडितेच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने २० लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ३३ आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशीही मागणी आठवले यांनी केली.
केंद्रीय मंत्री आठवले यांनी आज डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन डोंबिवली बलात्कार प्रकरणासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आठवले यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश दिला आहे. डोंबिवलीतील नागरिकांनी पुढे येऊन या पीडितेच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, असे आवाहन आठवले यांनी केले.
दिल्लीतील निर्भया प्रकरणावेळी मी संसदेत होतो. अशा गंभीर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असा कायदा केंद्र सरकारने केला आहे. पण, डोंबिवली प्रकरणातील ३३ आरोपींना फाशी व्हावी. येत्या सहा महिन्यांत हे प्रकरण ‘जलदगती न्यायालयात’ चालवून आरोपींना शिक्षा दिली जावी. या घटनेचा पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या वतीने निषेध करतो, असेही आठवले यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘हा मोदींनी बदललेला नवा भारत आहे! बाप कोणीही असो गुन्हेगारांना शोधून दंड दिला जातो’
- पंकजा मुंडेंच्या अनुपस्थितीमुळे पाहणी दौऱ्यातून फडणवीसांची बीड जिल्ह्याकडे पाठ
- ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्वतःच्या खुर्च्या उबविण्यातच जास्त रस आहे’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
- ‘राष्ट्रवादीने अजितदादांना मुख्यमंत्रिपद द्यायला हवे!’, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मागणी
- भाजप आ.नमिता मुंदडा यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

