🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 14 दिवसांनी खातेवाटप जाहीर केले. मात्र, खातेवाटपानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील नाराज दिसत आहेत. एरव्ही पत्रकारांशी सहज बोलणारे जयंत पाटील यांनी मात्र ‘नो कमेंट्स’ असे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळले. यावरून वित्त आणि नियोजन खाते मिळालेले जयंत पाटील नाराज असल्याच्या नव्या चर्चेला उधाण आले होते.
त्यानंतर आता ठाकरे सरकारचं तात्पुरतं खातेवाटप जाहीर झाल्यानंतर मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी ठाकरे सरकारचं खातेवाटप घोषित केल्यानंतर अवघ्या 48 तासांच्या आतच खातेबदल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये केले बदल. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली मान्यता १/२
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 14, 2019
मंत्रिमंडळ खात्यातील बदल खालीलप्रमाणे
जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते श्री. @Jayant_R_Patil यांच्याकडे तर अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते श्री.@ChhaganCBhujbal यांच्याकडे देण्यात आले आहे. २/२— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 14, 2019
जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते आता जयंत पाटील यांना देण्यात आले आहे. तर अन्न आणि नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण ही खाती आता छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली आहेत. म्हणजेच भुजबळ आणि जयंत पाटलांच्या काही खात्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. खातेबदलाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. अर्थात अदलाबदल झालेली खाती दोघांकडे कायमस्वरुपी राहणार की तात्पुरती, हे अद्याप अस्पष्ट आहे. तसंच या बदलांमागील कारणही समजू शकलेलं नाही. तरीदेखील महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस असल्यानेच हे खातेबदल करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.
नव्याने छगन भुजबळ यांच्याकडे असणारे खाते
ग्रामविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन, अन्न आणि नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण
नव्याने जयंत पाटील यांच्याकडे असणारे खाते
वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, ग्राहक संरक्षण, कामगार, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1205768208113815553?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1205768007248515072?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1205765921656098816?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
