मुंबई : राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली होती.
सतत दोन दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येईल असे सामंत यांनी स्पष्ट केले होते. याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येतील आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही सामंत यांनी केले होते.
दरम्यान आता या परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर झाल्या असून 9 आणि 10 ऑक्टोबरला सीईटीची पुन्हा परीक्षा घेतली जाईल असे सामंत यांनी सांगितलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे मेल करावा अस आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकरी संकटात, पोकळ आश्वासनांची नव्हे तर तातडीच्या मदतीची गरज; फडणवीसांची कळकळीची विनंती
- महिला शिल्पकाराचा कमाल…पवारांचा ९ फूट उंच मेटलचा पुतळा साकारला; सुळेंनी केलं कौतुक
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- भुजबळांना भेटलोही नाही; अंडरवर्ल्ड डॉन धमकीप्रकरणी निकाळजे यांचा दावा
- गोव्यात किती विकास झाला हे संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंना विचारावं; राणेंनी डिवचलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
