🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सत्तेवर येताच ठाकरे सरकारने 2 लाख पर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले आहे. यावरून विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारने सरसकट कर्जमाफी करण्याचं आश्वासन देऊन केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसली आहेत. असा आरोप केला आहे. याच संदर्भात आज कोल्हापूर येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली आहे.
ते म्हणाले की, राज्य सरकार कर्जमाफीसाठी मार्चपर्यंतची प्रतीक्षा करण्यास सांगते आहे आणि दुसरीकडे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकही रुपया मदत द्यायला तयार नाही. कर्जमाफी जाहीर करताना ती केवळ पीककर्जासाठी असल्याचे फडणवीस म्हणाले.
आमच्या काळात कर्जमाफी दिली गेली, तेव्हा त्यात अल्प आणि मध्यम मुदतीचे कर्ज सुद्धा समाविष्ट करण्यात आले होते. 1.5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आमच्या सरकारनेच माफ केले होते, त्यामुळे या नव्या कर्जमाफीचा फायदा फार शेतकऱ्यांना मिळणार नाही. आपल्या राज्याची आर्थिक स्थिती अन्य राज्यांच्या तुलनेत अतिशय उत्तम आहे. मुद्दाम गैरसमज पसरविले जात आहेत.
नागरिकत्व कायद्याबाबत देखील फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. नागरिकत्व सुधारणा कायदा हा कोणत्याही धर्म किंवा जातीविरुद्ध नाही. हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे, काढून घेण्यासाठी नाही. विरोधी पक्ष मुद्दाम संभ्रमाचे वातावरण तयार करीत आहेत. हे केवळ मतांसाठीचे राजकारण आहे, अशी टीका त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1209083814468673536?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1209080904766779394?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
