Share

कृषिमंत्रीपदाची लॉटरी लागलेल्या दादा भुसेंबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सुमारे आठवडाभाराने नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे.

तसेच राज्याच्या कृषीमंत्रीपदी अखेर शिवसेनेच्या दादा भुसे यांची वर्णी लागली आहे. दादाजी भुसे यांनी महायुतीच्या सरकारमध्ये सहकार, ग्रामविकास खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्यावर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाणारे कृषीखाते सोपवण्यात आले आहे. दादा भुसे यांनी यंदा सलग चौथ्यांदा मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत निवडून येण्याचा मान मिळवला आहे.

शिवसेना तालुका प्रमुख, मालेगाव; पक्षाच्या सर्व उपक्रमांत सक्रीय सहभाग आहे. जागर शिवशाहीच्या माध्यमातुन सर्वसामान्य माणसांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आहे. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन अनुदान योजना व श्रावण बाळ पक्ष योजनेचे अनुदान लाभार्थ्यांना मिळवून दिले आहे. रस्ते , पिण्याचे पाणी , आरोग्य सुविधा यांसारखी सामाजिक कामे केली आहे.

महिला बचतगटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. शासकीय पडिक जागा व गावठाणातील सरकारी जमीन 15,000 लाभार्थ्यींना मिळवून दिली. वनहक्क समितीच्या माध्यमातून वनजमिनी नियमित केल्या; दारिद्रय रेषेखालील व्यक्तिंना मदतः मालेगाव येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहे.

आमआदमी विमा योजना, स्वर्णजयंती ग्रामीण रोजगार योजना राबविली. लोकसहभागातून ए. पी. जे. अब्दुल कलाम बंधारा तयार केला आहे. गरीबांना अल्प किंमतीत घरे मिळवून दिली आहे. भारतनिर्माण व राष्ट्रीय पेय जल अंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे.

सामुहिक विवाह, गोरगरीब रुग्णांना मदत, रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली; शालोपयोगी वस्तूंचे वाटप; संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. जिमखाना सुरू केला आहे. व्यसनमुक्ती व स्वच्छता अभियान राबविले वनहक्क समितीद्वारे वनजमीन नियमित करणे, जागर शिवशाहीचा कार्यक्रमाच्या माध्यमातून जातीचे दाखले मिळवून देणे इ. कार्य केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!