मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि संपूर्ण प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. तसेच संशयित रुग्णांची कोविड-१९ चाचणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचे नवीन दूरध्वनी क्र मांक सुरू होत आहेत. ही सुविधा पुढील दोन दिवसांपासून सुरू होईल.
तसेच सध्या ज्या प्रवाशांना घरी कॉरंटाईन सल्ला देण्यात आला आहे आणि ज्यांना त्रास आहे त्यांना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद संस्थेने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेमध्ये कोविड चाचणी उपलब्ध आहे. हे हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित झाल्यानंतर, हेल्पलाईन वरील डॉक्टर संशयित रुग्णाची पूर्ण माहिती घेतील आणि गरज असल्यास कोविड चाचणी करण्याचा सल्ला देतील.
दरम्यान, चाचणी नमुना घरी येऊन घेणे आणि तपासणीसाठी ICMR संस्थेने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेत पाठवणे यासाठी समन्वय करून देतील. त्यामुळे आता घरच्या घरीच आता कोरोनाची चाचणी होणार आहे.
कोरोना व्हायरस’ने राज्यात मोठ्या प्रमाणात हात पाय पसराला सुरुवात केली आहे. तसेच मुंबईत सर्वाधिक 42 कोरोनाबाधित आहेत. तर, त्याखालोखाल पुणे आणि पिपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तिघेही मुंबईतील आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

