Share

श्रीनगर: हॉस्पिटलमध्ये दहशतवाद्यांचा धुमाकूळ

Published On: 

🕒 1 min read

श्रीनगर : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील श्रीहरी सिंह रुग्णालयातच दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी हॉस्पिटलमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला असून दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या आड दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. यापैकी एक दहशतवादी पाकिस्तानचा असल्याचं समजतं आहे.

अचानक झालेल्या या गोळीबारामुळे रुग्णालयात एकच धावपळ झाली. ज्याचा फायदा घेऊन दोन दहशतवादी पसार झाले. या दहशतवादी हल्यानंतर येथील संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून फरारी दहशतवाद्यांचा सध्या कसून शोध सुरु आहे. तसेच रुग्णालय परिसरातही मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

नेमकं काय झालं
आज (मंगळवार) सकाळी श्रीनगरच्या सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या सहा दहशतवाद्यांना नियमित तपासणीसाठी SMHS रुग्णालयात आणण्यात आलं होतं. याचवेळी नवीद उर्फ अबू हंझला या लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यानं पोलिसाच्या हातातून बंदूक हिस्कावून घेत गोळीबार केला. दहशतवादी अबू हंझला सध्या फरार आहे. अचानक उडालेल्या या गोंधळाचा फायदा घेऊन दोन दहशतवादी फरार झाले. हा हल्ला पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्यांच्या सहकारी दहशतवाद्यांना मुक्त करण्यासाठी करण्यात आला आहे. काही सशस्त्र दहशतवाद्यांनी हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला आणि गोळीबार सुरू केला. या गोळीबारा दरम्यान दहशतवाद्यांकडून अश्लिल भाषेत शिविगीळ करण्यात आली. गंभीर म्हणजे या दहशतवाद्यांसह अबू हंझलाही पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!