Share

औरंगाबाद-बीड रोडवर ‘एसटी-ट्रक’चा भीषण अपघात; १५ जख्मी, चार जणांचा जागीच मृत्यू..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: रविवारी सकाळी एसटी महामंडळाची बस आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीड येथे घडली आहे. लातूर-अंबाजोगाई रोड वर हा अपघात झाला असून यात सहा जणांचा जागीच मृत्यू तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे नेमके कारण अजूनपर्यंत समजू शकलेले नाही. मात्र जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती हाती येत आहे.

अंबाजोगाई-लातूर रस्त्यावरील बरदापुर फाट्याजवळ हा अपघात झाला. ही बस लातूरहून औरंगाबादला निघालेली होती. तर प्लास्टिकचे पाईप घेऊन जाणारा ट्रक हा अंबाजोगाईहुन लातूरकडे जात होता. त्यावेळी हा अपघात झाला. प्लास्टिक पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रकची आणि लातूर-औरंगाबाद-लातूर या एसटी बसची बरदापुर फट्यानाजिक एका वळणावरती जोरात धडक झाली. अपघाताचे नेमके कारण अजून कळालेले नसून दाट धुक्यामुळे अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

हा अपघात इतका भिषण होता की यात ट्रक व बसच्या काही भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघाताची भीषणता इतकी होती की क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहनांमधून जखमींना बाहेर काढावे लागले. ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर १५ प्रवासी गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातातील जखमींना बरदापुर आणि स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र सकाळच्या सुमारास झालेल्या या अपघाताने एकच खळबळ उडाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!