Share

मुलामुळे ९५ वर्षीय आई कोरोना पॉझिटिव्ह, हिंमत न हारता लढली शेवटी कोरोनाला हरवलेच!

Published On: 

औरंगाबाद : कोरोना आला आणि प्रत्येकाच्या मनात कोलाहल माजले. पॉझिटिव्ह येण्याच्या भितीने माणसे माणसांपासून दुरावली. अनेक ठिकाणी मुलांनी आईबापावर अंतिम संस्कार करण्यास नकार दिला. मात्र एवढ्या भयंकर परिस्थितीतही एक व्यक्ती अशी होती जिला स्वतः पेक्षा बाहेर जाणाऱ्या आपल्या लेकराची चिंता होती ती म्हणजे ‘आई’! कन्नड येथील ९५ वर्षीय आई मुलाची काळजी घेतल्याने पॉझिटिव्ह आली. स्वत: पॉझिटिव्ह येऊनही हातपाय न गाळता मुलाला हिंमत देत राहिली. आणि शेवटी आईचे प्रेम जिंकले, कोरोनालाही हातपाय टेकावेच लागले. आणि मायलेकांनी कोरोनाला हरवलेच.

म्हणतात ना, कि सगळे जग जरी तुमच्या विरोधात उभे राहिले तरी जोपर्यंत आई तुमच्या पाठीशी ठामपणे उभी असते तोपर्यंत कोणीही तुमचे काहीच बिघडवू शकत नाही. कन्नड येथे वास्तव्यास असणारे मनवर कुटुंबीय. दोन भाऊ, यातील एक कारंज लाड याठिकाणी राहत असे. तर दुसरा प्राध्यापक कन्नड याठिकाणी ९५ वर्षीय आईचा सांभाळ करत होता. यातील प्राध्यापक भावाला कोरोनाची लागण झाली.

घरीच राहून होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु केले. मात्र वेड्या आईची वेडी माया, कोरोनाला न जुमानता कोणाचेही न ऐकता आईने मुलाची काळजी घेतली. त्याला काय हवे नको ते पाहिले. मात्र या सगळ्यात तिने स्वत:ची काळजी घेतलीच नाही. आणि शेवटी ज्याची भिती होती तेच झाले. ९५ वर्षीय आई पॉझिटिव्ह आली. वय जास्त असल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना त्वरीत घाटीत दाखल करण्यात आले.

याचवेळी आईच्या काळजीने मुलाचीही तब्येत बिघडली. मात्र घाटीत बेड उपलब्ध नसल्याने मुलगा खाजगीत तर आई घाटीत उपचार घेत होते. या परिस्थितीत आईची काळजी घेण्यासाठी दुसरा मुलगा पुढे आला. हरिभाऊ मनवर आपल्या आईसाठी घाटीत येऊन राहिले. सुरुवातीला आपल्या आईची तब्येत नाजूक होती मात्र नंतर हळूहळू ती बरी झाल्याचे त्यांनी सांगितले होते. १० ते १२ दिवसांच्या उपचारांनंतर त्या बऱ्या झाल्या आणि सुखरुप घरी परतल्या, आणि तेही आपल्या मुलासहित. वय वर्षे ९५ असूनही हिंमत न हारता आपल्या ७० वर्षीय मुलालाही बळ देत या माऊलीने कोरोनाला हरवलेच.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!