Share

महसूल विभागाने सोशल डिस्टन्सिंग आणि वाटप सुरळीत होण्यासाठी घेतला अत्यंत मोठा ‘निर्णय’…

Published On: 

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकारकडून कठोर पावले उचलली जात आहेत. लॉकडाऊन आणखी पंधरा दिवस वाढल्याने सर्व स्वस्त धान्य लाभार्थींना सरकारकडून अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर महसूल विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीड जिल्ह्यातील शिक्षक कर्मचारी आजपासून पुढील तीन महिने जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकान समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

यासाठी अंबाजोगाई तालुक्यातील एकशे बहात्तर दुकानांसाठी पावणे दोनशे शिक्षकांची स्वस्त धान्य दुकान समन्वयक म्हणून तीन महिन्यांसाठी महसूल विभागाकडून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

दरम्यान, लाभार्थी स्वस्त धान्य घेण्यासाठी पात्र दुकानासमोर सोशल डिस्टंन्सिंगचा नियम पाळत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे अभिक कोरोनाचा धोका वाढू शकतो, म्हणून तालुक्यातील पावणेदोनशे शिक्षकांची स्वस्त धान्य दुकान समन्वयक म्हणून तीन महिन्यासाठी नेमणूक करण्यात आलेली आहे, अशी माहिती तहसीलदार संतोष रुईकर व पुरवठा अधिकारी प्रकाश गोपड यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!