🕒 1 min read
मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबाद शहराला ‘संभाजीनगर’ (Sambhajinagar) असे नाव देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचे नाव बदलून ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला होता. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दिवंगत दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले होते. त्यात कालच या नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने स्थगिती दिली होती. मात्र याबाबत आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अशात टाटा ग्रुपने मात्र एक सकारात्मक पाऊल घेतले आहे.
‘क्रोमा’ (Croma) ही टाटा समूहाची उपकंपनी असून इन्फिनिटी रिटेल द्वारे चालवली जाणारी ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि टिकाऊ वस्तूंची भारतीय रिटेल साखळी आहे. त्याच्या उत्पादन श्रेणीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्राहक टिकाऊ श्रेणीतील 500 हून अधिक उत्पादनांचा समावेश आहे. या क्रोमावर लोकेशन मध्ये आता ‘औरंगाबाद’ नव्हे तर ‘संभाजीनगर’ असे लिहून येत आहे.
क्रोमा ब्राऊझरच्या पोर्टलवर गेल्यावर लोकेशनसाठी ४३१००१ ते १० पर्यंत पिन कोड टाकल्यावर संभाजीनगर दिसून येत आहे. त्यामुळे जे पाऊल अद्याप मंत्री मंडळाने नाही घेतले ते पाऊल टाटा ग्रुपने घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे सध्या हा विषय चर्चेचा ठरत आहे.
नामांतराबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय-
दोन दिवसांपूर्वी १४ तारखेला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणे, थेट सरपंच, नगराध्यक्ष निवड असे मोठे निर्णय घेतल्यानंतर आज पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यात औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर शिंदे सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला.
२९ जूनला पूर्वीच्या सरकारने काही निर्णय घाई-गडबडीने घेतले. पुढे त्यावर कायदेशीर बाबी निर्माण होऊ नये, म्हणून हे प्रस्ताव फेरसादर करण्याचे आदेश आम्ही दिले होते. आज नामांतरासंदर्भातल्या फेरप्रस्तावांना रीतसर मान्यता देण्यात आली असून औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद शहराला धाराशिव तर नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ, असे नाव देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
- Vijay Salvi | “उद्धव ठाकरे यांच्या समोरच एकनाथ शिंदेंचा फोन आला होता, मात्र…”; विजय साळवींचा खुलासा
- Vijay Shivtare : “तुम्ही काय माझी हाकलपट्टी करणार मीच…”, विजय शिवतारेंचा शिवसेनेला टोला
- Uddhav Thackeray | पालघर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष शिंदे गटात सामील
- Mahesh Tapase | देवेंद्र फडणवीस ४० आमदारांचा प्रस्ताव घेऊन राज ठाकरेंकडे गेले होते?- महेश तपासे
- Sanjay Raut : “शिवसेनेच्या पंखाखाली राहून स्वाभिमान जपू नये…”, संजय राऊतांचे बंडखोर आमदारांना आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
