टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव ठाकरे यांनी आज तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये घोषित केले असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील तारा नायट्रेट या कंपनीत भीषण स्फोट झाला.या स्फोटात कंपनीच्या मालकासह ६ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक कर्मचारी जखमी आहेत. नटुभाई पटेल असे मयत कंपनी मालकाचे नाव आहे.कंपनी मालकाचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला आहे. या स्फोटावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालघर तारापूर औष्णिक केंद्र, डहाणू, पालघर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परिसरातील वीजपुरवठा बंद केल्याने मृतदेह शोधण्यास आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अडथळे येत आहेत.
स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बचाव कार्यावर लक्ष ठेऊन असून, एनडीआरएफची मदतही घेण्यात येत आहे.मुख्यमंत्र्यांनी आज स्फोटाची माहिती मिळताच तात्काळ मुख्य सचिव आणि जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली. तसेच यामधील बचाव कार्यावर आणि जखमींच्या उपचारावर प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
